Friday, 5 August 2011

व्यसन सोडा बदला स्वतःला

घे रे मना उंच भरारी
नको देवू त्रास स्वताला
व्यसनाने का तो सुटे गुंता
इथे न  कळणार कुणाला
तुझ्या..........................
ताणलेल्या  मनाची व्यथा
जेवढा गुंतशील व्यसनात
तेवढा जाशील वाहवत
इथे न कोणी कोणाचा
अरे देवा....................
का मग तू देई त्रास स्वताला
तुझी क्षणाची तृप्ती
उडवेल जीवनावरील भक्ती
नको देवू त्रास शरीरा
तुझे शरीर..................
तुझ्या देवाची काया
घाल लगाम मनाला
नको लावून घेवू हृदयाला
हीच तर खरी तुझी परीक्षा
टाक झटकून वेड्या मनाची
व्यथा.....................
घे रे मना उंच भरारी
नको पाहूस मागे वळून
दुख,यातना,आठवणींच्या सावल्या
व्यसनाने घातला तुला विळखा
तू सवयीचा
गुलाम.........................
दे मुठ माती तुझ्या
वाईट सवयींना
आज नाही तर कधीच नाही 
अन मग बघ
उगवणारा सूर्यही तुझाच
नि मग रात्रीचा चंद्र हि
तुझाच ....................

No comments:

Post a Comment

पाऊस _Rain