Friday, 5 August 2011

एक धागा राखीचा

अंतरीचे गुज
सांगते मी मनोहरा
दोन्ही डोळा आल्या धारा
राखी पौर्णिमेचा दिस आला
बंधू माझा नाही आला....
सूर्य माथ्यावर आला
दिस सरता सरेना
माझ्या राजसी भाऊराया
खंत वाटते  मनाला
बंधू माझा  नाही आला....
चंद्र बघ आकाशी आला
राखी बांधिते मी आता
आकाशीच्या ग चंद्राला
घोर लागला जीवाला
बंधू माझा नाही आला....
एक हाक आली कानी
ताई ..ताई...
आला राखी पौर्णिमेला
माझा भाऊराया आला......
पाट टाकुनिया घालते
रांगोळी मी हौसी
ओवाळीते भाऊराया
बांधून राखीचे बंधन
आला राखी पौर्णिमेला
माझा भाऊराया आला....
भाऊ माझा भाग्याचा
कर रक्षण त्याचे देवा
आई बाबांचा लाडका
आम्ही जीवापल्याड जपला..
एक धागा राखीचा
भाऊ तुझ्या माझ्या प्रेमाचा
आला राखी पौर्णिमेला
माझा भाऊराया आला....

 

No comments:

Post a Comment

पाऊस _Rain