Friday, 5 August 2011

एक धागा राखीचा

अंतरीचे गुज
सांगते मी मनोहरा
दोन्ही डोळा आल्या धारा
राखी पौर्णिमेचा दिस आला
बंधू माझा नाही आला....
सूर्य माथ्यावर आला
दिस सरता सरेना
माझ्या राजसी भाऊराया
खंत वाटते  मनाला
बंधू माझा  नाही आला....
चंद्र बघ आकाशी आला
राखी बांधिते मी आता
आकाशीच्या ग चंद्राला
घोर लागला जीवाला
बंधू माझा नाही आला....
एक हाक आली कानी
ताई ..ताई...
आला राखी पौर्णिमेला
माझा भाऊराया आला......
पाट टाकुनिया घालते
रांगोळी मी हौसी
ओवाळीते भाऊराया
बांधून राखीचे बंधन
आला राखी पौर्णिमेला
माझा भाऊराया आला....
भाऊ माझा भाग्याचा
कर रक्षण त्याचे देवा
आई बाबांचा लाडका
आम्ही जीवापल्याड जपला..
एक धागा राखीचा
भाऊ तुझ्या माझ्या प्रेमाचा
आला राखी पौर्णिमेला
माझा भाऊराया आला....

 

Wednesday, 3 August 2011

...नागपंचमी

चला सख्यांनो नागपुजनाला
दही दुध लाह्या,
नागोबाला भरवूया
नटुया थटूया
धम्माल ती मज्जापन करूया
शृंगाराचा साज
 सणांचा हा बहार
जीवनाला लाभू दे
मायेचा पाझर
प्रीतीचे कुंपण
नात्यांचा जिव्हाळा
 मैत्रीचा ओलावा
देवा कर
सुखाची बरसात

पाऊस _Rain