Friday, 4 October 2013

स्वाभिमानाने लढा

1. जगात दुसऱ्याला हसण्याइतके सोपे व दुसऱ्यासाठी रडण्याइतके कठीण काम दुसरे कोणतेही नाही.

2. दान स्वीकारणाऱ्याने आपल्याला मिळालेले दान कधीही विसरू नये आणि दान देणाऱ्याने आपण ते दिले हे कधीही लक्षात ठेवू नये.

3. जिथे आपल्या अस्तित्वाची गैरहजेरी जाणवत नाही तिथे उपस्थित राहण्यात काय अर्थ ??...

4. आपण वाऱ्याची दिशा बदलू शकत नाही. परंतू. आपला पतंग मात्र निश्चितच नियंत्रित करु शकतो.

5. अन्यायापुढे मान झुकवू नका. स्वाभिमानाने लढा. फ्रत्येक जुलूमाविरुध्द योग्य मार्गाने लढा. उच्च नीचतेच्या कल्पना बदलून टाका. जातीपाती सोडून द्या. अज्ञानाचा अंधकार जेवढा मोठा आहे, तेवढेच मोठे ज्ञानदीप लावा. सगळे जग हाच तुमचा देश आहे. त्याचे रुप बदलण्यासाठी मनापासून प्रयत्न करा.

6. मृत्यू म्हणजे दु:ख नसून तो जन्माहून श्रेष्ठ आहे. ज्या परमेश्वराने इतका सुंदर जन्म दिला तो या जन्माचा शेवट वाईट गोष्टीत कधीच करणार नाही.

7. तुम्ही आपल्या कर्माचा पडदा काचेसारखा स्वच्छ कराल तर त्यातून तुम्हाला परमेश्वर दिसेल.


Thursday, 26 September 2013

क्षण

एक असाही क्षण
कधी खूप हवाहवासा
वाटणारा
कधी उंच आकाशात
गगन भिरक्या घेऊ
वाटणारा
कधी मनमोकळा श्वास
शांत नि स्तब्ध
भासणारा
कधी भिरभिरणारा वारा
अलगद स्पर्शून रोमारोमात
सुखावणारा
कधी उमलनाऱ्या फुलांचा
दरवळणारा सुगंध मनाला
प्रसन्न करणारा
कधी गोड स्मित हास्य
खळखळून आणणारा
एक असाही क्षण
जीवाला जीवाची गोडी
लावणारा 

पाऊस _Rain